सदर परिपत्रक विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून प्राप्त झाले आहे. सर्व प्राध्यापक, परीक्षा विभाग, प्रशासकीय विभाग व विद्यार्थी यांच्या माहिती करीता अग्रेषित करीत आहे.
प्र. प्राचार्य,
शहाजीराजे महाविद्यालय, खटाव
प्रति,
1) मा. प्राचार्य/संचालक,
सर्व संलग्नित महाविद्यालये व मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्था,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
2) मा. अधिविभाग प्रमुख,
सर्व अधिविभाग
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
विषय:- शैक्षणिक वर्ष 2023-24 मधील ऑक्टो/नोव्हे. 2023 हिवाळी सत्रातील होणाऱ्या परीक्षेचे परीक्षा अर्ज भरण्याच्या तारखाबाबत.
संदर्भ:- शिवाजी वि./परीक्षक नियुक्ती/आरव्हीसी/465, दि. 26 जूलै, 2023 चे परिपत्रक
महोदय/महोदया,
आपणास अवगत करणेत येते की, ऑक्टो./नोव्हे., 2023 मध्ये आयोजित करावयाच्या परीक्षांच्या प्रारंभ तारखा उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. सदर परीक्षेचे परीक्षा अर्ज स्विकारण्याच्या तारखा व परीक्षा शुल्काबाबतचे परिपत्रक क्र. 02 सोबत पाठविण्यात येत आहे. सदरचे परिपत्रक सर्व संबंधीत विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांच्या निदर्शनास आणावे.
डॉ. अजितसिंह जाधव
संचालक
परीक्षा व मूल्यमापन मंडळ, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.